Experience sharing
- Vedanti Vaidya
- May 11, 2024
- 1 min read

या महिन्यात समतानगर, ठाणे येथील अराडीया सोसायटीत श्री. अरविंद जोशी काकांच्या पुढाकाराने पूर्वांचलात विवेकानंद केंद्रामुळे काम करण्याच्या अनुभवाबद्दल गप्पांची संधी मिळाली. त्यांच्या सोसायटीत गेल्या काही दिवसांपासून हा उपक्रम चालवतात जिथे महिन्यातून एकदा रात्री जेवणानंतर सगळे भेटतात आणि नव-नवीन विषयांवर चर्चा होते.
विवेकानंद केंद्राबद्दल माहिती, त्यांची पूर्वांचल विशेषकरून अरूणाचलच्या कामाची व्याप्ती आणि माझा मणिपूर आणि अरूणाचलचा अनुभव अशा गप्पा झाल्या. मणिपूर आणि अरूणाचलला त्यांच्या भौगोलिक (geographical), ऐतिहासिक (historical) आणि सांस्कृतिक (cultural) दृष्टिकोनातून मांडायचा प्रयत्न केला. हाच वारसा जपण्यासाठी, किती प्रकारची आव्हानं आपल्याला तिथं जाऊन काम करण्यासाठी आवाहन करत आहेत याच समीकरण मांडलं. या सव्वा तासांच्या गप्पांमध्ये उपस्थितांनी दाखविलेला रस प्रेरणायदायी वाटला आणि हा विषय अजून घरोघरी पोहोचावा यासाठी प्रयत्नशील राहण्याचं ठरवलं.
या कामासाठी आणि पूर्वांचलासाठी आपण विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून कशा पद्धतीने जोडले जाऊ शकतो आणि आपलाही एक खारीचा वाटा उचलु शकतो हे जाणून घ्यायचे असेल तर संपर्क करावा.

Comments